भंडारा जिल्हा कुठे आहे?www.marathihelp.com

भंडारा जिल्हा कुठे आहे?

भंडारा हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक जिल्हा आहे. हा जिल्हा राज्याच्या ईशान्य भागात आहे. भंडाऱ्याची लोकसंख्या ११,९८,८१० आहे. जिल्ह्याचे क्षेत्रफळ ३७१६ चौरस किलोमीटर आहे. हा जिल्हा तळ्यांसाठी व सुगंधी तांदुळाच्या जातींसाठी प्रसिद्ध आहे. याला तलावाचा जिल्हा म्हटले जाते. भंडाऱ्यात ३,६४८ लहान लहान तळी आहेत.

हा जिल्हा वनसंपत्तीत व खनिजसंपत्तीत समृद्ध आहे. भंडारा शहर हे या जिल्ह्याचे मुख्यालय आहे.


भौगोलिक

जिल्ह्याची समुद्रसपाटीपासूनची सरासरी उंची २४४ मीटर (८०० फूट) आहे.

भंडारा जिल्ह्याच्या उत्तरेस बालाघाट जिल्हा (मध्य प्रदेश), पूर्वेस गोंदिया, दक्षिणेस चंद्रपूर तर पश्चिमेस नागपूर जिल्हा आहे. उत्तरेकडे सातपुडा पर्वताचा डोंगराळ भाग आहे. [१] या जिल्ह्यात लोहखनिज विपुल प्रमाणात असून येथील प्रमुख पिके पुढीलप्रमाणे- तांदूळ, गहू, मिलेट (एक तृणधान्य). तांदळाच्या चिन्नोर, दुभराज, काळी कमोद या सुवासिक जाती प्रसिद्ध आहेत. भंडारा हा महाराष्ट्रातला सर्वात जास्त प्रमाणात तांदूळ पिकविणारा जिल्हा म्हणून प्रसिद्ध आहे.

वैनगंगा ही जिल्ह्यातील प्रमुख नदी आहे. या नदीचा जिल्ह्यातील प्रवाह उन्हाळ्यातसुद्धा कोरडा पडत नाही.

या जिल्ह्यात बावनथडी, चूलबंद, कन्हान, बाघ , गोसे धरण, कवलेवडा धरण, ही धरणे आहेत.
अर्थव्यवस्था

भंडाऱ्यातील अर्थव्यवस्था मिश्र असून ती शेती आणि जंगले यांपासून मिळणाऱ्या उत्पन्नावर आधारित आहे.

सामाजिक
नोर्गालिंग तिबेटन हा तिबेटी समाज महाराष्ट्रमध्ये १९७२ पासून भंडारा जिल्ह्यात राहतो आहे. जवळपास १००० तिबेटी लोक जिल्ह्यातील नोर्गेलिंग येथे राहतात.

प्रेक्षणीय स्थळे
जिल्ह्यातील प्रेक्षणीय स्थळे - अंबागड किल्ला, कोरांबी देवीचे मंदिर, इंदिरा सागर प्रकल्प , श्री हनुमान मंदिर चांदपुर मंदिर , गायमुख (महादेव मंदिर), पवनी किल्ला, पांडे महाल भंडारा, गरुड खांब पवनी, गोसे धरण, मोहाडी देवीचे मंदिर, माडगी येथील वैनगंगा नदीवरील यात्रा, सिन्द्पुरि येथील बौद्ध विहार,लाखांदूर तालुक्यातील झरी तलाव, चप्रालचि पहाडी.


जिल्ह्यातील तालुके

भंडारा तालुका,
साकोली,
तुमसर,
पवनी,
मोहाडी,
लाखनी व
लाखांदूर

solved 5
General Knowledge Friday 28th Oct 2022 : 13:42 ( 1 year ago) 5 Answer 3415 +22